AVATAR MEHER BABA
Don't worry, Be Happy
पश्चात्ताप प्रार्थना
हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चात्ताप होत आहे.
असत्य, अन्याय्य व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चात्ताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याहीबद्दल आम्हाला पश्चात्ताप होत आहे.
प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चात्ताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देउनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चात्ताप होत आहे.
आणि विशेषतः, दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल , दुसऱ्यांस दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल, आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चात्ताप होत आहे.
हे प्रभुराज! आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर.