top of page

संकेतस्थळाचा उद्देश आणि अस्वीकरण (Disclaimer)

मेहेर बाबांचे शब्द , त्यांचे संदेश , त्यांचे  साहित्य , छायाचित्रे , आणि चत्रफीती ह्यांचे , सर्वाधिकार अवतार मेहेर बाबा पर्पेच्युअल चारीटेबल ट्रस्ट अहमदनगर ह्यांच्या कडे आहेत.  सर्वाधिकार ट्रस्ट कडे  ठेवण्यामागे मेहेरबाबांच्या शिकवणीचे , त्यांच्या शब्दांचे अर्थहरण होऊ नये ,  हाच मेहेरबाबा ट्रस्ट चा  हेतू आहे , इतर कोणताही व्यावसायिक हेतू  नाही . म्हणूनच ट्रस्टच्या संकेतस्थाळावर मेहेरबाबांच्या साहित्य, संदेश सर्वांना विनामूल्य उपलब्ध केले जात आहे. त्या साहित्यातील बहुतांश  ग्रंथ आणि संदेश  इंग्लिश मध्ये आहेत आणि त्यांचा अधिकृत मराठी अनुवाद / भाषांतर उपलब्ध नाही . सर्व साहित्य मराठीत (आणि कालांतराने इतर भारतीय भाषांमध्ये) भाषांतर करून ते विषय सर्वांपर्यंत पोहचावे हाच ह्या संकेत स्थळाचा - shrimeherbaba.com - उद्देश आहे. 

 

ह्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यावसायिक उद्देशाने हे संकेतस्थळ तयार करण्यात आलेले नाही. मेहेरबाबांनी त्यांच्या सर्वच प्रेमींना त्यांच्या शब्दाची व्याख्या करण्याचे स्वातंत्र्य दिले असले , तरी अशा वेळी ते शब्द मेहेरबाबांचे नसून ते व्याख्या कर्त्याने लावलेला व्यक्तिगत अर्थ आहे असे सुरुवातीलाच सांगणे आवश्यक आहे हे त्यांचे सांगणे असे.  मेहेरबाबांनीच दिलेल्या या नियमाचे पालन करण्याचे सर्व प्रयत्न या संकेतस्थळाच्या निर्मितीत केले गेले आहेत.

bottom of page