अवतार मेहेर बाबा
काळजी करू नका, आनंदी रहा
माझी मेहेरझाद मुलं
The above Documentary "My Meherazad Boys" by Sachin Singh and Robert Fredricks focuses on stories narrated by three men: Madhav V. Kamble, Bapu N Dete, Laxman Bhonde who served at Meherazad, looking after Avatar Meher Baba and His Mandali.
They were also responsible for carrying Baba on His chair after the Satara accident. Unfortunately, the fourth man, Shankar who was also detailed for carrying Baba, passed away a few years ago, which made it even more imperative that stories of those who were in close proximity with Baba must be recorded and shared.
The film is interspersed with 1960s archival footages of Baba and the Mandali at Meherazad with the "Meherazad Boys" lending delightful context to certain incidents when narrated by them.
An engaging watch for those seeking a deeper insight into the time surrounding Avatar Meher Baba's life and rhythm at Meherazad.
अवतार श्री मेहेर बाबांचा चित्रफीत दालन
परमात्म्याची सात नावे
परमात्म्याच्या सात नावांची ही सहज-सुंदर प्रार्थना जगातील सर्व महत्वाच्या धर्मांचे प्रतिनिधित्व करते. ७ जून १९२७ रोजी मेहेरबाबांनी स्वतः ह्या प्रार्थनेची रचना केली होती. आणि कोणत्या चालीत तिला गायचे आहे तेही त्यांनीच सांगितले होते. मेहेराश्रम शाळेतल्या मुलांना ही सात नावे रोज म्हणायला मेहेरबाबांनी सांगितले होते.
“हरी, परमात्मा, अल्ला, अहुरमज़्द, गॉड, यझदान, हू” हीच ती प्रार्थना.
रोज सकाळी शाळा भरल्यावर एक मुलगा ही म्हणत असे आणि त्यानंतर इतर सर्व मुले सामूहिक रित्या जप करीत असत. रोज सुरुवातीला १५ ते ३० मिनिट आणि प्रत्येक तासानंतर पाच मिनिट असा जप शाळेत होत असे. सुरुवातीच्या प्रार्थनेच्या वेळी मुले आपले हात जोडून, आणि सूर्याकडे तोंड करून उभे राहत असत.
जुलै १९४० मध्ये मेहेरबाबांनी हीच प्रार्थना आपल्या महिला मंडळींना दिली. त्यांना आपल्या हस्ताक्षरात ही सात नवे लिहून, त्यांना ती पाठ करायला सांगितली. मग सात दिवसांनी तिचा जप अगदी हृदयापासून करायला सांगितलं. त्यासाठी अतिशय कसोशीने प्रयत्न करायला सांगितले. ते असेही म्हणाले की “तुमच्या बाजूने उत्तम प्रयत्न झाले, तर त्यामुळे माझ्या वैश्विक कार्याला हातभार लागणार आहे. तुम्ही माझे आज्ञा पालन १००% केले तर मला मदत करू शकाल! प्रेम ध्यानाची अखेरची पायरी आहे. परमेश्वराविषयीची तळमळच तुम्हाला या अखेरच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाते. मी जेंव्हा म्हणतो ‘हृदयापासून’ प्रेम करा तेंव्हा त्याचा अर्थ होतो की सर्वप्रथम तुमच्या हृदयात असा भाव जागृत करा की तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वराचे नाव घेत आहात. त्यानंतर आपल्या मनात अशी धारणा करा की सर्व नावे त्या एकाच परमेश्वराची आहेत. मी त्या नावांना अशा क्रमात निवडले आहे की त्यांचे गायन मनोभावे केल्यास त्यातून एक कंपन तयार होईल. मी मस्तांना देखील हे म्हणायला सांगणार आहे. त्याचा अधिक खोलवर परिणाम होईल.”
चित्रफीत तयार करणाऱ्या डेबी नोर्डिन यांचे निवेदन :
मेहेरबाबाप्रेमींनो,
या अवतारकालात मेहेरबाबांनी ज्या अनेक गोष्टी जगाच्या अध्यात्मिक इतिहासात प्रथमच आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामध्ये मेहेरबाबांनी स्वतः ज्याचे संगीत रचले अशी एक सुरावट आहे. एके दिवशी मला (डेबी नोर्डिन) ह्या सुरावटीवर आधारित एक साडे सहा मिनिटांची चित्रफीत करण्याची प्रेरणा मिळाली. ह्या चित्रफितीत महिला मंडळींनी मेहेरबाबांनी दिलेल्या परमेश्वराच्या सात नावांचा जप त्यांच्या समाधीस्थळात केला आहे. ह्या चित्रफितीत सुरुवातीला वाद्यांवर आधारित सुरावट आहे आणि नंतर महिला मंडळींचा मंत्रमुग्ध करणारा जप आहे....
डेबी नोर्डिन