top of page

प्रभू प्रार्थना किंवा परवरदिगार प्रार्थना

हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस . 

तू अद्वैत व अतुलनीय आहेस. 

तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. 

तुझ्या ठायी रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही . 

तू अमर्याद आणि अगाध आहेस. 

तर्क व कल्पना यांपलीकडे आहेस. 

तू सनातन व अविनाशी आहेस. 

तू अविभाज्य आहेस. 

दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. 

तू सतत होतास, तू सतत आहेस, व सतत राहशीलही. 

तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही तूच आहेस. 

तू आकाशमंडळात आहेस, पाताळांत आहेस. 

तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. 

तू सर्व भूमिकांत आहेस आणि सर्व भूमिकांच्या पलीकडेही तूच आहेस. 

तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवनापलीकडेही आहेस. 

तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. 

तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस.

तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. 

तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. 

तू ज्ञानसिंधु आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. 

भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून, स्वयमेव ज्ञानच आहेस. 

तू दयेचा सागर असून, सदैव कल्याणकारी आहेस. 

अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. 

सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. 

तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. 

तू आदिपुरुष असून श्रेष्ठांहून श्रेष्ठ आहेस. 

तू प्रभू व परमेश्वर आहेस. 

तू परमदेव असून, परात्पर परमात्मा आहेस.

तू परब्रह्म आहेस. 

तू अल्लाह, इलाही, यज़्दान, अहुरमज़्द व प्रियतम परमेश्वर आहेस. 

तुझे नाव एजद, अर्थात एकमेव पूजनीय आहे.

bottom of page